वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी तालुका व जिल्हा तेली समाज सेवा संघाचे वतीने गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे विद्यार्थी तसेच समाजातील कला, क्रिडा, सामाजिक, राजकीय इत्यादी क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यामधून पाचवी, आठवी शिष्यवृत्ती दहावी, बारावी, पदवीधर तसेच कला, क्रिडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात समाजातील विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो. हा गुणगौरव समारंभ समाजातील स्वयंस्फूर्तीने सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करणारे समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संपन्न असतो. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जेष्ठ प्राध्यापक सर्वोदय छात्रालयाचे माजी व्यवस्थापक हरिश्चंद्र गीते उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, गणपतीपुळे देवस्थानचे माजी सरपंच विनायक राऊत, राजापूर तालुकाध्यक्ष विद्याधर राणे, लांजा तालुकाध्यक्ष प्रकाश लांजेकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष संतोष रहाटे, गुहागर तालुकाध्यक्ष प्रकाश झगडे, जिल्हासचिव संदीप पवार, जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर, वधू वर सूचक मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष पावसकर, कोकण विभाग महिलाध्यक्षा प्रियंका भोपळकर, रत्नागिरी शहर महिला मंडळ अध्यक्षा कल्पना लांजेकर, राजापूर शहर महिला मंडळ अध्यक्षा कल्याणी रहाटे, रत्नागिरी तालुका कार्याध्यक्ष सचिन ( बबलू)कोतवडेकर, रत्नागिरी तालुका सचिव रूपेश शेलार,मंडणगड तालुका सचिव चंद्रकांत तुकाराम झगडे,चिपळूण तालुका सचिव दिनेश लांजेकर, पंचायत समिती सदस्य विनोद झगडे,जि.प.सदस्या विनया झगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी शहर महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी सुमधुर स्वरात ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून कार्यक्रमात वातावरण निर्मिती केली. शशिकांत कोतवडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुख्य गुणगौरव कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम प्राथमिक वर्गाच्या मुलांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या १० विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी व आठवी वर्गाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या ९ विद्यार्थी, तसेच कला, क्रीडा व इतर प्राविण्य मिळवणाऱ्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वांना प्रमाणपत्र, संताजी महाराजांची प्रतिमा, एक डझन वह्या भेट म्हणून देण्यात आली. माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ मध्ये उज्वल हे संपादन करणाऱ्या एकूण ६५ विद्यार्थ्यांचा गौरव प्रमाणपत्र, संताजी महाराजांची प्रतिमा, भेटवस्तू देऊन करण्यात आला.उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ मध्ये विज्ञान विभागातून १३, वाणिज्य, विभागतून ११ कला विभागातून १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजातील राजकीय व उच्च अहर्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला यामध्ये डॉक्टर वकील, नोटरी, अशा क्षेत्रातून उत्तुंग यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राजकीय कारकीर्द घडवणाऱ्या चिपळूण पंचायत समिती सदस्यपदी निवड झालेले विनोद प्रकाश झगडे, जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झालेल्या विनया विनोद झगडे, लांजा नगरपंचायत नगरसेविका प्रणाली गुरुप्रसाद तेली, गुहागर नगरपंचायत नगरसेविका म्हणून निवड झालेल्य सुषमा सुधाकर रहाटे व लायन्स क्लब खजिनदारपदी नेमणूक झाल्याबद्दल फोटोग्राफर प्रदीप हरचिरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश नाचणकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा व रत्नागिरी तालुक्यासह सर्व तालुका, युवा, महिला पदाधिकारी, यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते सर्वश्री संदीप पवार, दिनेश नाचणकर, सचिन लांजेकर, अमोल लांजेकर, निलेश कोतवडेकर, शशिकांत कोतवडेकर, राकेश आंब्रे, नारायण झगडे गुरुजी, बबलू कोतवडेकर, रुपेश शेलार, मंगेश शेट्ये, प्रमोद भडकमकर, मनोहर कोतवडेकर, काशिनाथ सकपाळ, मकरंद पावसकर, अजय नाचणकर, दिगंबर भडकमकर, संध्या नाचणकर, सर्व सहिला मंडळ कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली.









































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.