loader
Breaking News
Breaking News
Foto

अयान घारे यांची यूकेमध्ये वास्तुकला विषयातील पदव्युत्तर पदवी संपादन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथील प्रसिद्ध उद्योजक समीर घारे यांचे चिरंजीव अयान समीर घारे यांनी युनायटेड किंगडम (यूके) येथील कॉव्हेंट्री विद्यापीठातून वास्तुकला विषयातील पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ आर्किटेक्चर) संपादन केली आहे. अपार मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार केले आहे. यूकेमध्ये वास्तुकला विषयातील उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी मिळविलेले हे यश घारे कुटुंबीयांसह लांजा तालुक्यासाठीही अभिमानास्पद असल्याचे बोलले जात असुन तरुणांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. सामाजिक कार्यकर्ते उद्योजक परवेज घारे यांचे अयान घारे हे नातू आहेत. अयान यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg