loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड कुंभारआळीतील पाणीप्रश्न अखेर मार्गी

खेड - खेड नगर परिषद हद्दीतील कुंभार आळी परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेचे सभापती सतीश चिकणे. नगरसेविका रशिका खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले यांनी मुख्याधिकारी रोडगे तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून काम पूर्ण झाल्याने अनेक वर्षांपासून भेडसावत असलेली पाणीटंचाई दूर झाली.

टाईम्स स्पेशल

नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, नगरपरिषदेच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी संबंधित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg