रत्नागिरी (जमीर खलफे) : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः विविध रानभाज्यांचे संकलन करून आकर्षक पद्धतीने प्रदर्शन भरविले. विक्रीचे नियोजन केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्व कमाईचा आनंद अनुभवता आला. प्रत्येक सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सरासरी २०० रुपयांचा व्यवसाय केला.
प्रदर्शनात टाकळा, भारंगी, काकवी, सुरण, कटाळ, अळू, फोडशी, कुडा यांसह एकूण १५ प्रकारच्या रानभाज्या होत्या. या रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व आणि आरोग्यदायी गुणधर्म यांची माहितीही विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली. प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध रानभाज्यांची खरेदी केली.
मुख्याध्यापिका संजना तारी, माजी शिक्षिका अस्मिता फाटक, पालकसभा उपाध्यक्ष संतोष गोरीवले व मानसी सोमण उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, उद्योजकता आणि स्वावलंबनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण २५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यावसायिक कौशल्ये आणि निसर्गाविषयी जाणीव निर्माण होते, असे सांगितले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.