loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी विद्यार्थ्यांकडून बोडदे शाळेला ४० खुर्च्यांची भेट

तिलारी(प्रतिनिधी)- बोडदे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ४० खुर्च्या शाळेला भेट दिल्या. प्रशांत ज्ञानेश्वर गवस, लक्ष्मण (बापू) प्रकाश गवस आणि भिष्मा पांडुरंग पारधी यांनी ही मदत केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेची शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेसाठी काहीतरी योगदान देण्याच्या उद्देशाने ही भेट देण्यात आली. या उपक्रमासाठी वासुदेव गवस आणि संदीप लक्ष्मण नाईक यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी बोलताना प्रशांत गवस म्हणाले, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पाहून शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे, या उद्देशाने आम्ही ही भेट दिली आहे.

टाइम्स स्पेशल

वासुदेव गवस यांनी शिक्षणप्रेमींनी आपल्या गावातील शाळांच्या विकासासाठी पुढे यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी संदीप नाईक तसेच समितीच्या अन्य सदस्यांनी मदत करणार्‍या मान्यवरांचे आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg