loader
Breaking News
Breaking News
Foto

‘घाडीगावकर सहकारी पतपेढी मर्या. मुंबई’ या पतपेढीची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मुंबईत पार

सिंधुदुर्ग - घाडीगावकर सहकारी पतपेढी मर्या. मुंबई या पतपेढीची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मुंबईत पार पडली. त्या सभेस संचालकांसह अनेक सभासद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेची सुरवात भारताची प्रख्यात गायिका आशाताई भोसले, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार व समाजातील इतर थोर व्यक्ती, भारताचे वीरमरण झालेले सैनिक व पतसंस्थेचे सभासद यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहून, सभेला सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे संस्थेचे पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर शांताराम वायंगणकर यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे सखोल व समाधानकारक उत्तर दिले तर काही वेळा कार्यकारी संचालक सुहास दत्ताराम गावकर यांनीही प्रश्नांची उत्तरे दिली. सदर सभेमध्ये महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेली नवीन सुधारित केलेली नियमावली सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली आहे. सभेत सोमा घाडीगावकर आणि विजय घाडीगावकर यांचेसह सर्व कर्मचार्‍यांनी व्यवस्थित नियोजन केले होते. शेवटी सुहास गावकर यांनी आभार मानून राष्ट्रगीताने सभा संपविण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg