loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष साळुंखे यांची हेडकॉन्स्टेबलपदी पदोन्नती

कर्जत, (जयेश जाधव) - कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय पोलीस नाईक संतोष मल्लारी साळुंखे यांची पोलीस हेडकॉन्स्टेबल पदावर पदोन्नती झाल्याने कर्जत तालुक्यासह पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या साळुंखे हे कर्जत पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात कार्यरत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जबाबदारीने व निष्ठेने सेवा बजावत आहेत. सेवा, सुरक्षा आणि शांतता या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला साजेशी कार्यपद्धती, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि अथक परिश्रम यामुळे त्यांनी सहकारी व नागरिकांच्या मनात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या पदोन्नतीमागे अनेक वर्षांची समर्पित सेवा, शिस्तबद्ध कामकाज आणि उत्कृष्ट कार्यक्षमता असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशामुळे कर्जत पोलीस ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg