loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथे नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - "माझं गाव...आरोग्य संपन्न गाव"... अभियान अंतर्गत ..समता फाउंडेशन भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण, चिपळूण, प्राथमिक आरोग्य चिखली अंतर्गत - आरोग्य मंदिर वरवेली यांच्यावतीने व ग्रामपंचायत वरवेली यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत वरवेली, येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नेत्र तपासणी शिबिरामध्ये संशयित मोतीबिंदू ९ रुग्ण निदान झाले. इतर रुग्णांवर उपचार करण्यात आले. सर्व रुग्णांचे रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. यावेळी उपसरपंच मृणाल विचारे, नेत्रतज्ञ डॉ.ओंकार कटक, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड, समुदाय आरोग्य अधिकारी योगेश गायकवाड, आरोग्य सेविका प्रज्ञा पागडे, आशा सेविका दिव्या किर्वे, अनुष्का शिंदे, आरोग्य सेवक अभिलाष इंगोले , प्रल्हाद विचारे, वैभव पवार, प्रभाकर किर्वे, दीपक किर्वे, दत्ताभाई विचारे, उपकेंद्र मदतनीस पौर्णिमा गमरे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg