loader
Breaking News
Breaking News
Foto

केर ग्रामस्थांच्या पाठीशी काँग्रेस ठाम; पर्यावरणाला हानिकारक प्रकल्पांना विरोध

तिलारी, (प्रतिनिधी) : केर परिसरात प्रस्तावित पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला दोडामार्ग तालुक्यात थारा दिला जाणार नाही. केर ग्रामस्थांच्या न्याय्य लढ्यात काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही काँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यावरणाची अपरिमित हानी करून होणारा विकास काँग्रेस पक्षाला मान्य नसल्याचे स्पष्ट करताना गवस म्हणाले की, विकासाच्या नावाखाली तालुक्यातील निसर्गसंपत्तीची नासधूस होऊ देणार नाही. जल, जंगल आणि जमीन यांवर स्थानिक ग्रामस्थांचाच प्रथम अधिकार असून, त्यांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही. संबंधित प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तत्काळ फेटाळून लावावा. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता किंवा त्यांना वेठीस धरून कोणताही प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

टाईम्स स्पेशल

"धनदांडग्यांच्या हितासाठी तालुक्यातील नैसर्गिक संपत्ती ओरबाडू देणार नाही. पर्यावरण संवर्धन, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करेल. ग्रामस्थांच्या लढ्यात काँग्रेस त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहील," असा निर्धार बाबू गवस यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg