बांदा (प्रतिनिधी) - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 6 लाख 31 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (25 जुलै) जुन्या पत्रादेवी–बांदा मार्गावरील आरोसबाग तिठ्याजवळ करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासणी नाका इन्सुली पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाची झडती घेतली.
वाहनाच्या मागील सीट व डिकीत लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या 25 बॉक्समधील 212 बाटल्या आढळून आल्या. जप्त मद्याची किंमत 2 लाख 81 हजार 760 रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये असून, एकूण 6 लाख 31 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालक महेंद्र कैलास कोतवाल (वय 36, रा. हनुमानवाडी, असतापूर, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, मिलिंद माळी तसेच संदीप कदम, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.





























































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.