loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसेवा सप्ताहांतर्गत भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे देव्हारे महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार

मंडणगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोहिते आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा संवादक अमोल चोरगे यांच्या सहकार्याने आयोजित 'जनसेवा सप्ताह' अभियानांतर्गत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने देव्हारे येथील महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते महावितरण कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या जनसेवेतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अभिजीत देवळेकर म्हणाले, "महावितरणचे कर्मचारी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांपर्यंत अखंड वीजपुरवठा पोहोचविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांची कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव आणि समर्पित वृत्ती ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास देव्हारे महावितरण विभागाचे लाईनमन उमेश दरवडा, वरिष्ठ तंत्रज्ञ विनीत वेळासकर, विद्युत सहाय्यक रामेश्वर सोनवणे, बाह्यस्त्रोत कर्मचारी प्रथमेश राणे, स्वप्नील जाधव, अमर पवार तसेच महावितरणचे इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अभिजीत देवळेकर यांनी सांगितले की, 'जनसेवा सप्ताह' अभियानाच्या माध्यमातून समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या सेवेला मानवंदना देण्याचा उपक्रम भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी या अभियानांतर्गत राबवत आहोत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg