देवगड : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. नीलम धुरी, डॉ. रमाकांत गावडे, प्रा. अक्षता मोंडकर, प्रा. श्रुती कुंभार, प्रा.अविनाश पोरे आणि प्रा. अजित कानशिडे या सहा प्राध्यापकांची तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करिअर कट्टाचे कामकाज गतिमान होणार आहे. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. नीलम धुरी यांची सावंतवाडी तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या स्टेट रिसोर्स सेंटर–बँकिंग समिती सदस्य असून महिला सक्षमीकरण, साहित्य, सामाजिक कार्य आणि करिअर कट्टा उपक्रमातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच करिअर कट्टा राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेत उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
बांदा येथील रावसाहेब गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड श्रीमती सरस्वतीबाई गणशेठ वाळके कॉलेज ऑफ आर्ट्स येथील डॉ. रमाकांत गावडे यांची वेंगुर्ला तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यस्तरीय आर्थिक साक्षरता समिती सदस्य आहेत. गेल्या चार वर्षांपासून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांचे करिअर कट्टा समन्वयक म्हणून कार्यरत होते. देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अक्षता मोंडकर यांची देवगड तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टेट रिसोर्स सेंटर–उद्योजकता विकास समिती, राज्यस्तरीय करिअर संसद समिती तसेच राज्यस्तरीय स्टार्टअप समन्वय समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांना करिअर कट्टाचा आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ तसेच सलग दोन वर्षे सिंधुदुर्ग उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कणकवली महाविद्यालयाचे प्रा.अविनाश पोरे यांची कणकवली तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. करिअर कट्टा महाविद्यालयीन स्पर्धा २०२५–२६ मध्ये महाविद्यालयाने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कुडाळ येथिल संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा.अजित कानशिडे यांची कुडाळ तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. सन २०२५–२६मध्ये करिअर कट्टा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तसेच ॲड-ऑन कोर्स, विद्यार्थी संसद उपक्रम, सौर ऊर्जा जनजागृती, विविध विद्यार्थी क्लब, राज्यस्तरीय कार्यशाळा, विद्यार्थी संसद अधिवेशन, पूरग्रस्तांसाठी मदतनिधी संकलन अशा उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले त्यांच्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेण्यात आली आहे. कट्टा येथिल डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. श्रुती कुंभार यांची मालवण तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. करिअर कट्टा महाविद्यालयीन स्पर्धा २०२५–२६ मध्ये जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक द्वितीय क्रमांक, तसेच AWS Career Tour Competition मध्ये महाविद्यालयाला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या सर्व प्राध्यापकांचे महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे. जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिघे. प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.