loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार भास्करशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

वेळणेश्वर : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, रामपूर येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. आमदार भास्करशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा उपक्रम घेण्यात आला. रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करत त्यांना फळे देण्यात आली. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, युवासेना तालुका प्रमुख प्रीतम वंजारे, उपविभाग प्रमुख संतोषजी गोंधळेकर, शाखा प्रमुख संदेश खेडेकर, युवासेना उपतालुका प्रमुख प्रथमेश भोईसकर, डॉ. निकिता ताई शिर्के, सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यात आला. त्यामुळे या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg