सावंतवाडी (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्ग मंडळाचे कार्य उत्तम असून ही साहित्य चळवळ जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबवावी, माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत, असे प्रतिपादन 'कोमसाप'चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीत ऑनलाईन गुरुवंदना स्वीकारताना ते बोलत होते. गुरुपौर्णिमेनिमित्त पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा ही संपूर्ण सिंधुदुर्गवासियांची भेट आहे, असे सांगत कर्णिक यांनी सिंधुदुर्गातील कोकण मराठी साहित्य चळवळ अधिक प्रगल्भ करण्याचे आणि विविध साहित्यिक उपक्रम सातत्याने राबवण्याचे आवाहन केले.
या बैठकीस मार्गदर्शन करताना कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या दर्जेदार कामाचे कौतुक केले. अमराठी बांधवांना मराठी भाषा शिकवण्याच्या उपक्रमाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाणे येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच कोकणात राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते व जिल्हा खजिनदार आनंद वैद्य आणि जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. बैठकीत कुडाळ येथे साहित्यिक व लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करणे, जिल्हा साहित्य संमेलन, महिला संमेलन घेणे आणि दोडामार्ग, वेंगुर्ले, वैभववाडी व देवगड शाखांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जास्तीत जास्त नवीन सभासद नोंदणी करून संघटनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच पाईप क्लिंजरचा आगळावेगळा पुष्पगुच्छ तयार केल्याबद्दल काव्या सावंत हिचे कौतुक करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीचे सूत्रसंचालन व अहवाल वाचन जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी केले, तर आभार सहसचिव सुरेश पवार यांनी मानले. या बैठकीला प्रांतिक सदस्य रुजारिओ पिंटो, मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष वालावलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.