देवळे (प्रकाश चाळके) - लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आज सकाळी अचानक लांजा तहसीलदार कार्यालयाला भेट देत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या अचानक झालेल्या भेटीमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. प्रलंबित महसूल प्रकरणांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना ती तातडीने निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सामंत यांनी दिले. यावेळी आमदार सामंत यांनी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागातील छोट्या-मोठ्या कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वेळेत न्याय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, कोणत्याही नागरिकाला विनाकारण हेलपाटे मारायला लावले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, "माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला छोट्या-मोठ्या कामांसाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावू नका. नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करा. कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही." भेटीदरम्यान महसूल विभागातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही महत्त्वाच्या प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेऊन ती मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, जमीनविषयक प्रकरणे, दाखले, नामांतरण, फेरफार तसेच इतर महसूल विषयक अर्जांची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांशीही आमदार सामंत यांनी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देत नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले.
अधिकाऱ्यांनीही प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले. अचानक झालेल्या या पाहणीमुळे महसूल विभागातील कामकाजाला अधिक गती मिळणार असून नागरिकांची रखडलेली कामे लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आमदार किरण सामंत यांच्या या धडक पाहणीमुळे महसूल प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळेल, असा विश्वास तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.