loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा शहरातील रस्त्यावरचे खड्डे बुजवा; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

म्हसळा (वार्ताहर) - म्हसळा शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे तातडीने भरण्यात यावेत, तसेच रस्त्याच्या कडेला येणारी शेवाळी पावडर टाकून साफ करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना उबाठा शहरप्रमुख अभय कलमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे म्हसळा नगरपंचायतकडे केली आहे. हे मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष सुनील शेडगे आणी मुख्य अधिकारी विठ्ठल राठोड यांना सादर करण्यात आले. म्हसळा शहरातील अनेक वॉर्डात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच रस्त्यावर शेवाळी आल्याने वृद्ध, लहान मुले यांना चालण्यास त्रास होत आहे. तर दुचाकी या शेवाळी वरून घसरत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर खड्डे भरून शेवाळी सुद्धा पावडर टाकून साफ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष शौकत हजवाने, उप शहर प्रमुख दिपल शिर्के, नवमान वजगरे, शहर समन्वयक फहद पठाण, शहर संघटक अंकुश नटे, उप विभाग प्रमुख किसन म्हात्रे, समीर लांजेकर उपस्थीत होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg