loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. भैय्या सामंत यांनी ‘कोंडगाव ग्रामपंचायतला’ दिला पूर्णवेळ ग्रामसेवक

देवळे(प्रकाश चाळके)- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रामपंचायतला गेले अनेक वर्ष तात्पुरते ग्रामसेवक देऊन काम चालू ठेवले होते. त्यामुळे अनेक विकास कामांना अडथळा येत होता ही गोष्ट कोंडगाव विभागातील कार्यकर्त्यांनी आमदार भैय्या सामंत यांना साखरपा दौर्‍याच्या वेळी निदर्शनास आणून दिली. आमदार भैय्या सामंत यांनी कोंडगाव ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे निर्देश संगमेश्वर गटविकास अधिकारी यांना त्वरित दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार भैय्या सामंत यांच्या आदेशाप्रमाणे, संगमेश्वर तालुक्याच्या सभापती शर्वरी वेल्ये तसेच विकास अधिकारी यांनी त्वरित कोंडगाव ग्रामपंचायत साठी पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती केल्याचे पत्र विस्तार अधिकारी शंकर घुले यांच्यामार्फत ग्रामपंचायत कोंडगाव येथे प्रदान केले.

टाईम्स स्पेशल

याबाबत कोंडगाव मधील जिल्हा नियोजन समिती सदस्य बापूशेठ शेट्ये, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर कोंडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रध्दा शेटे , सदस्य गांधी, चव्हाण, केतकर, नयना, लक्ष्मण कदम, मंगेश जोयशी, जितेंद्र जोयशी आणि संजय गांधी, यांनी आमदार भैय्या सामंत यांच्या एक कॉल प्रॉब्लेम सॉलचा अनुभव आल्याबद्दल व कायमस्वरूपी ग्रामसेवक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg