loader
Breaking News
Breaking News
Foto

फुणगूस गावाच्या वीज समस्येबाबत महावितरणला निवेदन; गणेशोत्सवापूर्वी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- फुणगूस गावात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी तसेच स्थानिक उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गावातील चार गणपती मूर्ती निर्मिती कारखान्यांचे काम वारंवार विस्कळीत होत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत फुणगूस ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या शिफारसपत्रा सह माहीती अधिकार कार्यकर्ते सुभाष रमेश लांजेकर यांनी महावितरणचे संबंधित अधिकारी श्री. अंकूश कौरवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनामध्ये गावासाठी कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करावी, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा तसेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली. येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असल्याने गणपती मूर्ती तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये सध्या कामाचा मोठा वेग आहे. अशा परिस्थितीत वारंवार होणार्‍या वीज खंडितीमुळे उत्पादनावर परिणाम होत असून कारागिरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवा पूर्वी वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची हमी द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महावितरणच्या अधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारून या समस्येवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg