loader
Breaking News
Breaking News
Foto

शासनाचा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमातून भरली बांधावरची शाळा

वैभववाडी (प्रतिनिधी) - शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी बांधावरची शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत विद्या मंदिर मांगवली नं 1 येथील विद्यार्थ्यांनी दिलीप राणे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नाचणी लागवडकरून शेतीचा अनोखा अनुभव घेतला. शेतभेटीदरम्यान दिलीप राणे यांनी विद्यार्थ्यांना शेतीतील विविध अवजारे, पिकांची लागवड, शेतीची कामे तसेच कृषीविषयक विविध बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात सखोल भर घातली व प्रत्यक्ष अनुभवातून शेतीविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमास मांगवली गावचे सुपुत्र, राज्यस्तरीय "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार" प्राप्त प्रगतिशील शेतकरी महेश रामदास संसारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी विद्या मंदिर मांगवली नं. १ चे मुख्याध्यापक राहुल भाऊसाहेब नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता, श्रमप्रतिष्ठा, कृषीविषयक जागरूकता आणि शेतकऱ्यांविषयी आदरभाव निर्माण झाला. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, विद्या मंदिर मांगवली नं. १ने राबविलेला हा उपक्रम ग्रामीण शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg