loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड येथे नवीन मत्स्य महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव

देवगड - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे नवीन मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रामेश्वर येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा, असे निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी दिले. या प्रयोगशाळेमुळे कोकणातील आंबा व अन्य फळपिकांच्या गुणवत्तेचे वैज्ञानिक परीक्षण स्थानिक स्तरावर होणार असून, निर्यातक्षम उत्पादनांना चालना मिळेल. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अवशेष तपासणीची सुविधा उपलब्ध होऊन कोकणातील आंब्याच्या निर्यातीला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg