loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात कृषी विभागातर्फे ११ ऑगस्ट रोजी भरणार रानभाजी महोत्सव

केळंबे-लांजा दी.8ऑ(सिराज नेवरेकर) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी अंतर्गत लांजा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी २२ ते सायंकाळी ५.०० या वेळेत कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे रानभाजी महोत्सव, रानभाजी प्रदर्शन, विक्री आणि रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील पारंपारिक रानभाज्यांचे संवर्धन करणे, त्यांचे पौष्टिक महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच स्थानिक महिला, शेतकरी गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि रानभाज्यांचा प्रदर्शन व विक्रीद्वारे उत्पन्न वाढीस चालना देणे या उद्देशाने या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रानभाजी असलेला पदार्थ घरी तयार करून आणावा, पदार्थांसोबत पाककृती व पौष्टिक गुणधर्माची माहिती कागदावर लिहून आणणे आवश्यक आहे. तसेच पदार्थाची मांडणी सकाळी १०.०० ते १०.३० या वेळेत करावयाची असून विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती गौरी शेट्ये ९४०३१४४५८१ या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे . तरी परिसरातील शेतकरी, महिला बचत गट, विद्यार्थी ,नागरिकांनी या रानभाजी महोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg