loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम

सावंतवाडी : शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करणे तसेच नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये भटक्या कुत्र्यांना मानवीय पद्धतीने पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपचारानंतर संबंधित कुत्र्यांना नियमानुसार त्यांच्या मूळ परिसरात पुन्हा सोडण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येण्यास, रेबीजचा धोका कमी होण्यास तसेच मानव व प्राण्यांमधील सहअस्तित्व अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. ही मोहीम राबविताना नागरिकांनी कुत्रे पकडण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये, भटक्या कुत्र्यांची माहिती, त्यांचे वास्तव्य अथवा समस्या असल्यास नगरपरिषदेस कळवावी, पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांचे नियमित लसीकरण करून आवश्यक ती काळजी घ्यावी.

टाईम्स स्पेशल

कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता नगरपरिषदेच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरात सुरक्षित, निरोगी व संतुलित पर्यावरण निर्माण करण्यास निश्चितच मदत होईल. असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg