loader
Breaking News
Breaking News
Foto

५ हजाराची लाच स्वीकारताना सावर्डेचा मंडळ अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

​रत्नागिरी, दि. ५- जमिनीच्या खरेदी खताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव (वर्ग ३, महसूल विभाग) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयातच ही धडक कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​याप्रकरणी एका ४८ वर्षीय निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने एसीबीकडे ३ ऑगस्ट रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मौजे सावर्डे येथे गट नं. १३४७/३ मधील २१८ चौ.मी. जागा खरेदी खताने विकत घेतली होती. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी यांनी फेरफार नोंद करण्यास सांगून सदरचा फेरफार मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी अनिल जाधव यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी या कामासाठी ५,००० रुपये लाचेची मागणी केली होती.​या तक्रारीची पडताळणी बुधवारी पंचांसमक्ष करण्यात आली. त्यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तत्काळ सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. दुपारी १५:१० वाजता तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारून ती स्वतःजवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगताना जाधव याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.​ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.या सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, तसेच संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टाइम्स स्पेशल

भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg