आनंदवाडी, देवगड - आनंदवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या श्री हरिनाम सप्ताहाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली असून सध्या संपूर्ण आनंदवाडी गाव विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने दुमदुमून गेले आहे. विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत असून मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. श्री विठ्ठल मंदिर आनंदवाडी येथे आषाढ वद्य ११ शके १९४८, रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ झाला. सप्ताहानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असून ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘पांडुरंग हरी’ अशा जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
आनंदवाडी तसेच आजूबाजूच्या गावांमधून मोठ्या संख्येने विठ्ठलभक्त दर्शनासाठी दाखल होत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विविध व्यवस्था करण्यात आली असून दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावण्यात आल्या आहेत. विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरही आनंदवाडी येथे उपस्थित राहून श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत आहेत. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आनंदवाडीतील प्रत्येक घरातून येणार्या भाविकांचे आपुलकीने स्वागत करत करंजीसह प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. गावातील महिला, युवक आणि ग्रामस्थ या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. सप्ताहादरम्यान गावात विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात येत असून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंड्या मंदिराकडे मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे संपूर्ण आनंदवाडी परिसराला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे देखील आनंदवाडी येथील श्री हरिनाम सप्ताहाला भेट देऊन श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे सप्ताहाच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम असलेल्या आनंदवाडीच्या हरिनाम सप्ताहामुळे सध्या संपूर्ण परिसर ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषाने अक्षरशः दुमदुमून निघाला आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.