loader
Breaking News
Breaking News
Foto

विश्वेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व दैवज्ञ समाज विठ्ठल रखुमाई देवस्थान मंडळ व रूक्मिणी देवी महिला मंडळ खेड यांच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न

खेड - सौ. विजयालक्ष्मी मुरलीधर पेंडुरकर सभागृह सोनार आळी येथे विश्वेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड व दैवज्ञ समाज विठ्ठल रखुमाई देवस्थान मंडळ व रूक्मिणी देवी महिला मंडळ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार कै. जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांच्या १६१ वी पुण्यतिथी निमित्ताने १ ऑगस्ट -२०२६ रोजी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. दैवज्ञ समाजातील लहान मुलापासून ते शिष्यवृत्ती परीक्षेत व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या व विविध पदवी संपादित केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आपल्या मेहनतीने आणि मन लाऊन केलेल्या अभ्यासाने यश संपादन करत अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलेल्या या सर्वांचा सन्मान करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुणगौरव सोहळ्यास दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष संजय दांडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, रुक्मिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनल शेखर गुहागरकर, प्रमुख अतिथी म्हणून दापोली मधील उद्योजक कोकण रत्न पुरस्कार प्राप्त मिलिंदशेठ सैतवडेकर, चिपळूण येथील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स चे मालक राजेंद्र वेस्वीकर, मिरकर ज्वेलर्स चे मालक माधव उर्फ भाई मिरकर, जेष्ठ कबड्डी पटू रविंद्र लवेकर, उद्योजक राजू तारकर, उद्योजक अमोल नाचणकर, अजित दांडेकर, उदय दांडेकर,भूषण वैद्य आदी मान्यवरांनी या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

भविष्यातही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून देश व समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, हीच सदिच्छा व्यक्त केली. सदर वेळी उपस्थित जेष्ठ समाज बांधव चंद्रविलास कारेकर, मनोज पावसकर, प्रताप दांडेकर, भूषण कारेकर, डॉ नेहा दांडेकर, स्मिता गुहागरकर, संपदा गुजराथी, कृतिका धामणकर, माया गुहागरकर, जाई धामणकर, नेहा मुरूडकर, आदी दैवज्ञ समाज बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg