संगमेश्वर (सत्यवान विचारे) - श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान, रत्नागिरीच्या वतीने कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. दि. 10 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार पिढीजात कुंभार समाजातील पात्र कुटुंबांना व्यवसायासाठी 700 ब्रास माती मोफत उपलब्ध करून देण्याची योजना शासनाने जाहीर केली आहे. या योजनेची माहिती समाजातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने प्रतिष्ठानने जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांची प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शासन निर्णयाची अंमलबजावणी, लाभार्थ्यांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेबाबत तहसीलदारांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तहसील कार्यालयाकडून या विषयासंदर्भात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करून माहिती देण्यात आली होती. तसेच कार्यालयीन वेळेनंतरही वेळ देऊन सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार प्रवीण लोकरे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. निलेश कुंभार यांनी यावेळी तहसीलदारांचे विशेष आभार मानले.
या बैठकीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पडवेकर, उपाध्यक्ष डॉ. निलेश कुंभार, जिल्हा संघटक नाना पालकर, मार्गदर्शक जनार्दन माळवणकर, सहसचिव अमित बुरुंबाडकर, खजिनदार अनिल पडवेकर तसेच जिल्हा पदाधिकारी संतोष साळवी उपस्थित होते. यापुढील काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष जनजागृती मोहीम राबवून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेची माहिती प्रत्येक समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पडवेकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी समाजबांधवांनी श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.