loader
Breaking News
Breaking News
Foto

कसई दोडामार्ग येथे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन' उभारणीसाठी हालचाली; शासकीय जमिनीची मागणी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील कसई येथील शासकीय जमीन 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन' उभारणीसाठी सामाजिक व सांस्कृतिक हेतूने हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी 'समाज जागृती मंच दोडामार्ग' या संस्थेने तहसीलदार मा राहुल गुरव साहेबांकडे केली आहे. या संदर्भातील एक मागणीपत्र संस्थेच्या वतीने दोडामार्ग तहसील कार्यालयाला सादर करण्यात आले आहे. संस्थेने दिलेल्या पत्रानुसार, दोडामार्ग तालुक्यात ५७ गावे असून येथे मोठ्या प्रमाणावर दलित, वंचित, बौद्ध समाज बांधव तसेच सर्वधर्मीय नागरिक वास्तव्यास आहेत. तालुक्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यासाठी समाजाच्या हक्काच्या एका सामाजिक भवनाची (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन) अत्यंत आवश्यकता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कोणतीही हक्काची जागा किंवा सभागृह उपलब्ध नाही. या भवनाच्या उभारणीसाठी कसई दोडामार्ग येथील गट क्र. / सर्व्हे क्र. ४३/१ मधील 'गुरांची गोठण' ही १४ गुंठे शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे. ही जमीन उपलब्ध झाल्यास शासनाच्या विविध योजनांतर्गत किंवा लोकवर्गणीतून या भवनाचे बांधकाम करणे शक्य होणार असल्याचे मंचने म्हटले आहे. वनविभागाचे अभिप्राय पत्र आणि आवश्यक कागदपत्रे जोडलीया मागणीसोबत चालू वर्षाचा ७/१२ आणि ८ अ चे प्रलंबित पत्रक, संस्था नोंदणी प्रमाणपत्र तसेच सदर जमीन वनविज्ञेखाली (Forest Zone) येत नसल्याबाबत वनविभाग सावंतवाडी यांचे अभिप्राय पत्र देखील जोडण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

तहसीलदार साहेबांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून सदर जागेची पाहणी व चौकशी करावी आणि प्रस्तावित शासकीय जमीन 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन' बांधकामासाठी लवकरात लवकर हस्तांतरित किंवा अलॉट (Allocated) करून द्यावी, अशी नम्र विनंती संस्थेने केली आहे. या पत्रावर समाज जागृती मंचचे अध्यक्ष दिपक बुधाजी जाधव, सचिव संतोष सगुण कदम, खजिनदार महेश मोहन जाधव यांच्यासह उपाध्यक्ष गोविंद केशव कदम, सहसचिव शंकर शांताराम जाधव आणि सदस्य भगवान महादेव जाधव, मंगेश प्रकाश जाधव, उषाकिरण क्रांतीराज सम्राट, जेनिफर मार्शल लोबो, कैतान आंतोन डिसोझा, रुपेश अर्जुन शिरवलकर आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गुणाजी गवस,सीताराम जाधव, लक्ष्मण आयनोडकर,क्रांतिराज सम्राट, रामा कासकर,कृष्णा गोविंद जाधव, कृष्णा कदम संदीप कदम उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg