loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेश्वर येथे समुद्रात कुर्ले पकडताना पाय घसरला; चेतन परब यांचा दुर्दैवी मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) - कुणकेश्वर येथील अस्मी हॉटेलच्या खालच्या बाजूला सुरूच्या झाडाजवळ समुद्रात कुर्ले पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि. ५ ऑगस्ट) रात्री सुमारे ११.१० वाजण्याच्या सुमारास घडली. मृत युवकाचे नाव चेतन मोहन परब (वय ३५, रा. खालचीवाडी, कुणकेश्वर, ता. देवगड) असे आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) पहाटे १२.५८ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन परब हा आपल्या मित्रासमवेत समुद्रात कुर्ले पकडण्यासाठी गेले होते. कुर्ले पकडत असताना त्यांचा अचानक पाय घसरून तोल गेला आणि ते समुद्राच्या पाण्यात पडले. काही वेळाने पाण्याच्या प्रवाहासोबत ते किनाऱ्यावर आले. मात्र, त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच त्यांचे मामा दिनेश महादेव धुवाळी तसेच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, देवगड येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg