loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला, तर आंदोलन करू : अभिजीत दीपकेंची थेट घोषणा; देशात खळबळ

कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील आंदोलन सध्या संपलेले आहे. परंतु या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या देशभरातील तरुणांवर कारवाई केली जात आहे. याच कारवाईला सीजेपीने कठोर विरोध चालू केला आहे. सरकारने सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन पाळले जात नाहीये, असा आरोप सीजेपीने केला आहे. असे असतानाच आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानंतर दीपके यांनी आम्ही पुन्हा आंदोलन करू, असं म्हटलंय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांच्या मतानुसार सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सध्या जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यानुसार तपास चालूच ठेवावा, असे या आदेशात म्हणण्यात आले आहे. याच अंतरिम आदेशानंतर सीजेपीने असमाधन व्यक्त करत पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

टाइम्स स्पेशल

अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला, तर कॉकरोच जनता पार्टी लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण आंदोलन सुरू करेल. सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्याविरोधातील कारवाई तात्काळ थांबवावी.” असे म्हटलेय .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg