loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद सदस्य ‘प्रमोद गांधी’ यांच्या वतीने शृंगारतळी जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे दर्जेदार शैक्षणिक साहित्याचे वाटप

वरवेली(गणेश किर्वे)- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शृंगारतळी जिल्हा परिषद गटातील पाटपन्हाळे, वडद, कारूळ, विसापूर, पांगारी, परचुरी जानवळे, शृंगारतळी व इतर गावातील शाळा व अंगणवाडी मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये म्हणून शैक्षणिक साहित्य बरोबरच स्टीलच्या वॉटर बॉटल ही सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजातील वंचित आणि गरीब मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्याकडे कर्तुत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे तिन्ही गुण अंगी असल्याने सर्वसामान्य जनतेचे ते आधार बनले आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सुटू नये, विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी गुहागर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन थेट विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाला प्रोत्साहन देत आहेत. तालुक्यातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बरोबरच आर्थिक मदतीचा हातही त्यांचा नेहमी पुढे असतो. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी हे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे एक आवडती व्यक्ती म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांना नवीन साहित्य मिळाल्याने मुलांमध्ये शिकण्याची नवी गोडी आणि उत्साह निर्माण होतो. पालकांवरील आर्थिक भार कमी होतो. अत्यंत गरीब कुटुंबातील पालकांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळतो. या उपक्रमातून ते नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आहेत. अशा उपक्रमांमुळे समाजात एकमेकांना मदत करण्याची आणि दातृत्वाची भावना नक्कीच वाढीस लागणार आहे. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवलकर,तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुका अध्यक्ष अमीत खांडेकर, स्वप्नील जाधव, मुंढर शाखा अध्यक्ष सुजीत गांधी, राहूल जाधव, विश्वजीत पोतदार, तालुका सचिव प्रशांत साटले, प्रथमेश रायकर, अभिजीत रायकर, अनुज भुवड, रसीक पाटणकर, सुमीत पवार व सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg