loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत दादासाहेब सरफरे हायस्कुचे उल्लेखनीय यश, बैलगाडा शर्यत चित्राला प्रथम क्रमांक

बुरंबी (संगमेश्वर) - येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी-शिवने या प्रशालेतील विद्यार्थ्यानी बाल चित्रकला स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकामध्ये सुयश मिळविले आहे. माजी पालकमंत्री रविंद्र माने यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त कै. सौ. मिनाताई ठाकरे हायस्कुल साडवली देवरुख येथे आयोजित २४ व्या तालुकास्तरीय बालचित्रकला स्पर्धेत सरफरे विद्यालयातील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रावण महिन्यातील महाराष्ट्रातील पारंपारीक सण उत्सव व खेळ ही मध्यवर्ती कल्पना ठेवून प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक गट अशा तीन गटामध्ये आयोजित या बालचित्रकला स्पर्धेत तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. श्लोक शशिकांत घडशी (इ.९ वी) यानी काढलेल्या बैलगाडा शर्यत या चित्रास माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मिळाला. त्याच्या या चित्राबद्दल आयोजक व परीक्षक यांनी विशेष कौतुक केले. सार्थक सखाराम रामाणे (इ.१०वी) यांनी काढलेल्या बैलगाडा शर्यत या चित्रास द्वीतीय क्रमांक तर त्रिवेश राजाराम बाचम यांस ४ था क्रमांक मिळाला.

टाईम्स स्पेशल

उच्च प्राथमिक गटात कार्तिकी योगेश सप्रे (इ.८ वी) हिने काढलेल्या पारंपारीक सण ‘नाग पंचमी’ या चित्रास पाचवा क्रमांक मिळाला. या यशाबद्दल दादासाहेब सरफरे विद्यालय शाळा व्यवस्थापन वतीने आयोजित कार्यक्रमात प्रसन्न कुलकर्णी व सामजिक कार्यकर्ते गंगाधर टोपरे तसेच प्रशालेचे प्राचार्य प्रकाश भानुदास विरकर यांच्या हस्ते प्रशालेचे कला शिक्षक प्रदीप शिवगण यांचेसह बालचित्रकला स्पर्धेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांस सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg