loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवंशाची बेकायदा वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली, (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील सोवेली गावातील ज्ञानेश्वरी स्टॉप येथे बोलेरो पिकअपमधून गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (२८ जुलै) रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच.06.सिपी. 0858 मध्ये 24 हजार रुपये किमितीचा एक बैल, एक गाय व पाडी यांना वाहनामध्ये अत्यंत अरुंद जागेत दोरीने घट्ट बांधून त्यांच्या हालचालींवर बंधने आणत क्रूरतेने बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी महम्मद कादीर पोवेकर (वय ३५, रा. मुमूर्शी , ता. महाड, जि. रायगड) आणि तसलीम हुसेन जोगीलकर (वय ३२, रा. दहागाव, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ अधिनियम व महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम, प्राण्यांचे परिवहन नियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राणीमित्राच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करत आहेत. या प्रकरणातील तीनही गुरांना टेटवली येथील गोशाळेत पाठविण्यात आले असून त्याची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg