loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगडच्या रिक्षा व्यावसायिकांची अक्कलकोट भेटीसाठी रिक्षा सवारी

देवगड (प्रतिनिधी) - देवगड शहरातील रिक्षाचालक दरवर्षी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र यंदा काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी रिक्षातूनच देवगड ते अक्कलकोट असा प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. या अनोख्या भक्तीमय प्रवासाला शुक्रवारी दुपारी ३ वाजता देवगड येथून प्रारंभ झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाचा शुभारंभ देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी तसेच देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. उपस्थितांनी रिक्षाचालकांना त्याचा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

या यात्रेत रिक्षाचालक पिंटू जाधव, केतन कुबडे, बाबू कदम, छोटू मणचेकर, प्रकाश मुणगेकर, सचिन गिरकर, सचिन घाडी, पप्पू तारी, अंकुश हळदणकर, दशरथ पेडणेकर, संजय करंगुटकर, दामोदर खवणेकर व माया मुणगेकर असे एकूण १३ रिक्षाचालक चार रिक्षांमधून सहभागी झाले आहेत. देवगड ते अक्कलकोट असा प्रवास पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासात अक्कलकोट, पंढरपूर विठ्ठल रुखुमाई दर्शन, आणि कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर येथील धार्मिक स्थळांना भेट देण्यात येणार असल्याची माहिती रिक्षाचालक केतन कुबडे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg