loader
Breaking News
Breaking News
Foto

जेवताना घशात चिकनचे हाड अडकले; डॉक्टर बनले देवदूत; रुग्णाला दिले जीवनदान

चिपळूण- जेवताना घशात अचानक चिकनचे हाड अडकले तर अत्यंत ते जीवघेणं ठरु शकतं. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार करणं आवश्यक आहे. चिपळूणमध्ये एका व्यक्तीला रात्री जेवण केल्यानंतर अशाच एका विचित्र अडचणीला सामोरं जावं लागलं. घशात चिकनचे हाड अडकल्याने संबंधित व्यक्तीला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं. घरातील इतर सदस्यांनी त्यांना पाणी पिण्याचा सल्ला दिला. त्यांनी पाणी पिल्यानंतरही त्यांना होणारा त्रास कमी झाला नाही. यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर कुटुंबाने तातडीन रुग्णालयात धाव घेतली. तिथे डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याने संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या इ.एन.टी. विभागाने एक अत्यंत क्लिष्ट, नाजूक आणि धाडसी शस्त्रक्रिया करत रुग्णाचा जीव वाचवला आहे. रात्री जेवताना घशात चिकनचे हाड अडकलेल्या 53 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करत डॉक्टरांनी कुठलीही चिरफाड न करता हे हाड बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. चिपळूणमधीलएक ५३ वर्षीय नागरिक रात्री जेवण करत असताना त्यांना अचानक ठसका लागला आणि त्यानंतर त्यांचा घसा तीव्रपणे दुखू लागला. ते तातडीने रात्री १० वाजेच्या सुमारास वालावलकर हॉस्पिटलच्या अपघात विभागात दाखल झाले. येथील इ.एन.टी. सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी त्यांची ओपीडीमध्ये एन्डोस्कोपिक तपासणी केली असता, त्यांच्या स्वरयंत्राजवळ चिकनचे हाड अडकल्याचे निदर्शनास आले.

टाइम्स स्पेशल

णभरही विलंब न करता डॉक्टरांनी रुग्णाला तातडीने दाखल करून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. रुग्णानेही डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून प्राथमिक तपासण्या आणि सिटी स्कॅन पूर्ण केले. ऑपरेशनसाठी फिटनेस मिळाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी घेण्यात आले. इ.एन.टी. सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने, कुठलीही चिरफाड न करता (एन्डोस्कोपिकली) अडकलेले चिकनचे हाड बाहेर काढले आणि रुग्णाचे प्राण वाचवले. या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये डॉ. योशिता आणि सिस्टर श्वेता घाणेकर यांनी डॉक्टरांना सहाय्य केले. तसेच, ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉ. निवेदिता, डॉ. अभिजीत आणि डॉ. मयूर यांनी भूल देण्याचे (अनेस्थेशिया) महत्त्वपूर्ण काम पार पाडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg