loader
Breaking News
Breaking News
Foto

बळीराजासाठी एक दिवस, शालेय मुले शेतात रमली

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कसई केळीचे टेंब शाळेच्या विद्यार्थ्यांनी कसई केळीचेटेंब येथील प्रगतीशील शेतकरी सचिन उगाडेकर यांच्या शेतात प्रत्यक्ष जाउन पारंपारीक शेतीचा अनूभव घेतला. शेती हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जवळपास ६० टक्के लोक शेतीवरच उपजिवीका करतात. परंतू सध्याच्या युगात पारंपारीक शेती लोप होत चालली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजचा युवक पूर्णपणे शेतीपासून दूर होत आहेत ब-याच ठिकाणी शेतजमिनी पडीक व मोकळ्या आहेत. युवकांचे शेतीपेक्षा नोकरीकडे जास्त आकर्षण आहे. त्यामूळे लहान वयातच मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी व माहिती मिळावी याकरीता प्राथमिक शाळेतूनच एक दिवस थेट शेतीवरच मुलांना नेउन प्रत्यक्ष अनुभव देण्याात आला.

टाईम्स स्पेशल

केळीचे टेंब येथील प्रगतीशील शेतकरी सचिन उगाडेकर यांनी मुलांना शेतीची प्रत्यक्ष माहीती दिली व मार्गदर्शन केले. तसेच शेती करतांना मुले अगदी रमून गेली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी मळीक, सहाय्यक शिक्षक किरण भुजबळ, पालक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उगाडेकर पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg