loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेली-कोनाळकरवाडी येथे वडाची भलीमोठी फांदी धोकादायक अवस्थेत; अपघाताची शक्यता, तातडीने कारवाईची मागणी

साटेली भेडशी(प्रतिनिधी) - दोडामार्गतिलारी मुख्य मार्गावरील आंबेली येथील कोनाळकरवाडी परिसरात रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाची भलीमोठी फांदी तुटून धोकादायक अवस्थेत लटकलेली असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचार्‍यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी ही फांदी रस्त्यावर कोसळण्याची शक्यता असल्याने मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग-तिलारी हा मार्ग गोवा, तिलारी तसेच परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर दिवसभर लहान-मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत लटकलेल्या फांदीकडे वेळेत लक्ष न दिल्यास गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाचे लक्ष या धोकादायक परिस्थितीकडे वेधले असून, तातडीने पाहणी करून, फांदी सुरक्षितरीत्या हटविण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे किंवा मुसळधार पाऊस झाल्यास ही फांदी अचानक कोसळू शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग तसेच संबंधित प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg