केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुका तेली समाज सेवा संघ व लांजा तालुका युवा तेली समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ कार्यक्रम रविवार दि.०२ आगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडला. सर्वप्रथम तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज याच्या प्रतिमेला लांजा गावचे गावकार विठोबा लांजेकर आणि लांजा तालूका अध्यक्ष प्रकाश लांजेकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यावेळी रत्नागिरी तेली समाजाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, सहचिटणीस संदिप पवार, लांजा तालूका उपाध्यक्ष राजेश लांजेकर, सचिव गुरुप्रसाद तेली, सूरेश पडवळकर, महादेव गोलवस्कर, यूवा अध्यक्ष संदिप चव्हाण, जिल्हा यूवा सचिव रोहन पावस्कर आदि मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर लांजा तेलीवाडीतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची शोभा वाढविली. उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लांजा तालुका युवा तेली समाजाचे अध्यक्ष संदीप राजाराम चव्हाण यांनी केले. यावेळी लांजा तालुका तेली समाजाचे सहसचिव रामचंद्र लांजेकर यांनी या गुणगौरव कार्यक्रमास ज्यानी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याविषयी माहिती दिली.व स्कॉलरशिप परीक्षा, १० वी, १२ वी, पदवी, इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, गौरवपत्र, वही, पेन, शाल श्रीफळ तसेच जिजाऊ संस्थेच्या वतीनेही वह्या देऊन गुणगौरव करुन उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. महादेव गोलवस्कर यांनी मुलांना करियर गायडन्स, स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. सूरेश पडवळकर यांनी तालुक्यातील मुलांचा गुणगौरव केल्याने त्यांना पुढे चांगल्याप्रकारे अभ्यास करण्याची आवड निर्माण होईल, अभ्यासाला गती मिळेल असे, आपल्या मनोगतात सांगितले.
लांजा पंचायत समितीचे माजी गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत पावस्कर यांनीही विद्यार्थ्यांना करीयर विषयी माहीती देऊन मुलांनी अवांतर वाचन केले पाहीजे, त्यामूळे मेंदूला चालना मिळते, असे मौलीक मार्गदर्शन केले. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी समाजातील लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, तसेच मूलांना शालेय शिक्षण यावरती मार्गदर्शन केले. तर लांजा तालुका अध्यक्ष प्रकाश लांजेकर यांनी लांज्यातील समाजातील तेली समाज बांधवांनी एकत्र का यावे कोणत्याही गोष्टीचे राजकारण न करता समाज्याच्या हितासाठी काम करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक भरत लांजेकर यांनी केले. या कार्यक्रमाला लांजा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, नगरसेविका प्रणाली तेली, रोहण पावस्कर, महेश लांजेकर, अमोल शेलार, सुधाकर लांजेकर, जयवंत आंब्रे, केदार चव्हाण, संजय लांजेकर, दिपक लांजेकर, राकेश राऊत, प्रल्हाद रसाळ, दयाराम रसाळ, प्रभाकर पडवळकर आणि लांजा तेली समाजाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि लांज्यातील बहूसंख्याने तेली समाज बांधव विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.