तिलारी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या 'बांधावरची शाळा' या अभिनव उपक्रमांतर्गत बोडदे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोडदे गावातील प्रगतिशील शेतकरी फटी गणेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि आधुनिक शेती पद्धतींची सविस्तर माहिती दिली. शेती हा देशाचा कणा असून आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध शेती अवजारे, मशागतीची साधने तसेच बदलत्या काळानुसार शेतीत होत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी कृतीद्वारे समजावून सांगितली.
यावेळी निसर्ग आणि मानव यांचे नाते जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, ही समृद्ध परंपरा पुढील पिढीनेही टिकवून ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या संवादात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शेतीविषयी त्यांच्यात कुतूहल निर्माण झाले असून, आपणही आई-वडिलांसोबत शेतीच्या कामात सहभागी व्हावे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. बोडदे जिल्हा परिषद शाळा विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. स्पर्धा परीक्षा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, नृत्य, गायन आदी क्षेत्रांतही येथील विद्यार्थी यश संपादन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फटी गणेश नार्वेकर, नार्वेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी नाईक, उपाध्यक्षा शितल गवस, सर्व पालक, ग्रामस्थ, शिक्षक गोपाळ पाटील, मंजुश्री परब तसेच मुख्याध्यापक महेश नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतीविषयी नव्याने प्रेरणा घेतली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.