मालवण (प्रतिनिधी) - संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात आज देवळी समाज हितवर्धक मंडळे कार्यरत असून त्याद्वारे आपल्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, विविध पदांवर, क्षेत्रात कार्यरत समाज बांधव यांचा सत्कार केला जातो परंतु मागील 19 वर्षे सातत्यपूर्ण हा उपक्रम राबवून मालवण देवळी समाज मंडळाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उल्लेखनीय असे काम केले असून मालवण देवळी समाज मंडळाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद व आदर्शवत असे आहे असे प्रतिपादन देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग चे खजिनदार तथा ज्येष्ठ समाज बांधव रमेश नरसुले यांनी मालवण येथे केले. देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत शाखा मालवण आयोजित तालुक्यातील विद्यार्थी गुणगौरव व विविध पदांवर कार्यरत असलेल्या समाज बांधवांचा सत्कार मालवण वायर येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमेश नरसुले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर, जिल्हा सचिव विष्णू चौकेकर, पंचायत समिती सदस्या माधुरी मसुरकर, प्रदीप श्रावणकर, सुधाकर वेंगुर्लेकर, देविदास वेरलकर, ॲड. सायली आचरेकर, ॲड. अनघा तेंडोलकर, अरविंद तेंडोलकर आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी नरसुले यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यात अजूनही जातीपातीचे राजकारण केले जात आहे यासाठी समाज बांधवांनी संघटित राहून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आज काळाची गरज आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच आपल्या समाजाप्रती नेहमीच आदर राखून आपल्या शैक्षणिक कार्य सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी मालवण तालुक्यात सातत्याने मागील कित्येक वर्षे विद्यार्थी गुणगौरव व विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या बद्दल प्रथम मालवण मंडळ कार्यकारिणीला धन्यवाद देत आहोत. काही भागात अजूनही समाजाप्रती आदर भावना दाखविली जात नाही. यासाठी समाजातील या पुढील पिढीने सृजनात व सुशिक्षितपणा अंगी बाळगून देवळी समाज कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून द्यावे जेणेकरून इतर कोणाची आपल्या समाजाकडे बघण्याची वृत्ती आपोआपच कमी होईल. या साठी प्रथम घरातील प्रत्येकाने जिल्हा मंडळाचे सभासद होऊन आपल्या समाज आर्थिक दृष्ट्या ही कसा सक्षम होईल हे पहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी समाजातील इयत्ता 1ली ते 12वी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीन शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवणचे श्रीकृष्ण तळवडेकर, मधुसूदन परुळेकर, विष्णू चौकेकर, संतोष देऊलकर, सायली आचरेकर, वसंत वराडकर, अनिल तोंडवळकर, बाबल नांदोसकर, हरिश्चंद्र तळवडेकर, उमेश श्रावणकर, विपुल माळगावकर, देविदास वेरलकर, पूजा वेरलकर, हेमंत तळवडेकर, पूर्वा तळवडेकर, लौकिक तळवडेकर, यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णु उर्फ रमेश चौकेकर प्रास्ताविक आणि आभार देविदास वेरलकर यांनी मानले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.