संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कल्याण (वसारगाव) येथे समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ पोहोचावा, या उद्देशाने श्री शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने NCMC स्मार्ट कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिक, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ला. शेकडो महिलांनी या शिबिराचा लाभ घेत शासनाच्या महत्त्वाच्या योजनांमध्ये सहभाग नोंदविला आहे. शिबिरादरम्यान श्री शिवगर्जना प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि स्वयंसेवक यांनी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक ती मदत, कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन नोंदणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संपूर्ण शिबिर अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.
NCMC स्मार्ट कार्ड हे सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयुक्त असून, आयुष्मान भारत कार्ड पात्र लाभार्थ्यांना दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देणारे महत्त्वाचे साधन आहे. या दोन्ही योजनांबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळाल्याने उपस्थितांनी शिबिराचे मनापासून कौतुक केले आणि अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवगर्जना प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला. शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी समाजसेवी संघटनांनी सहकार्याची भूमिका दाखवली पाहिजे.
शिवगर्जना प्रतिष्ठानने "समाजसेवा हाच आमचा ध्यास" या ब्रीद वाक्याला साजेसा हा उपक्रम यशस्वी संपन्न केला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश बाईत, चंद्रकांत पाचकूडे, सचिन बाईत, संजय सावंत, सुरज गोमाणे, अमित होरंबे, योगेश बाईत आणि मिलिंद शिंदे यांनी विशेष कष्ट घेतले. तसेच या शिबिरासाठी प्राची इंटरप्राईजचे प्रवीण होडगे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे, विशेषतः महिला भगिनींचे, श्री शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही समाजहिताच्या विविध शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्या साठी प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवगर्जना प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य मंडळी असे समाजसेवी उपक्रम नित्य राबवित असतात. आपण या समाजाचे देणेकरी, ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या कृतीतून आदर्श निर्माण करणारे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य कौतुकास पात्र आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.