loader
Breaking News
Breaking News
Foto

फुणगूस येथील खड्डेमय रस्ता आमदार किरण सामंत यांनी स्वतःची यंत्रणा राबवून केला दुरुस्त!!

संगमेश्वर(वार्ताहर)- काही दिवसापूर्वी फुणगूस डिंगणी पुलाच्या डिंगणी कडील बाजूचा डिंगणीला जोडणारा २०० मीटरचा जोड रस्ता हा मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला होता व सदर खड्डे हे एक फुटाच्या उंचीपेक्षा मोठे होते. ही बाब येथील विभागप्रमुख महेश प्रभाकर देसाई यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ किरण सामंत यांना संपर्क केला. त्याप्रमाणे लांजा राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी मटेरियलसह मशिनरी पाठवून व स्वतःची यंत्रणा पाठवून संपूर्ण जोड रस्त्याचे खड्डे हे तात्काळ भरून दिले. सदर रस्त्याला सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे जाकादेवी कोळंबे मांजरे संपूर्ण खाडी भागातील रिक्षा व्यावसायिक हे याच रस्त्यावरून रिक्षा सीएनजी भरण्यासाठी डिंगणीत येत असतात. त्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. येथील विभागप्रमुख महेश देसाई यांनी भैय्या सामंत व संपूर्ण सामंत कुटुंबियाचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg