loader
Breaking News
Breaking News
Foto

सुभाष झोरे यांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

खेड - शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी 31 मार्च 2027 अखेर देण्यात येतील. याबाबतचे लेखी आश्वासन सहाय्यक निबंधक योगिता मुरडे यांनी दिल्यामुळे सुभाष झोरे यांनी गेले दोन दिवस सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले. खेड येथील सहाय्यक निबंधक यांनी खेडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात शामराव नागरी सहकारी पतसंस्थेचे दप्तर मिळण्यासाठी कोर्टाला विनंती अर्ज केला आहे. हा निकाल 4 ऑगस्ट 2027 रोजी लागणार आहे. त्यानंतर कोर्टाकडून सर्व दप्तर मिळण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर विनाविलंब या संस्थेची चौकशी केली जाणार आहे व त्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या रकमा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल म्हणून आपण हे उपोषण मागे घ्यावे अशी त्यांनी विनंती केली. यावेळी अनेक ठेवीदार सुभाष झोरे यांना पाठींबा देण्यासाठी जमले होते. सहाय्यक निबंधक योगिता मुरडे यांनी नारळ पाणी देऊन सुभाष झोरे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली, त्यानुसार झोरे यांनी उपोषण मागे घेतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg