वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायत आयोजित आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान संपन्न झाले. स्वच्छ, सुंदर , हरित गुहागर या उपक्रमांतर्गत “माझी वसुंधरा अभियान ७.०”, “एक पेड माँ के नाम” अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमास उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल, नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, तसेच स्वच्छता निरीक्षक प्रविण जाधव, शहर समन्वयक सुरज सपकाळ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. विराज महाजन व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रामेश्वर सोळंके, गुहागर नगर पंचायतचे नगरसेवक अमोल गोयथळे, अमरदीप परचुरे अणि सौरभ भागडे आणि नगरसेविका श्रेया मोरे, कोमल जांगळी, वैशाली मावळणकर, अनुशा भावे, विशाखा सोमण, मीरा घाडे, सुषमा रहाटे अणि विदिशा दणदणे या कार्यक्रमास उपस्थित होते. महाविद्यालयीन परिसरात काजू, केशर, फणस, लिंब, जांभूळ, जाम, आवळा, चिंच इ. झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल यांनी वृक्ष संवर्धन हे आजच्या पर्यावरण चळवळीसाठी अत्यंत आवश्यक असून उद्याच्या भवितव्यासाठी वसुंधरा अभियानात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गावा-गावात हे अभियान राबवावे, असे आवाहन केले. त्यानंतर मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संत तुकाराम महाराज यांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगाप्रमाणे वृक्ष हेच आपले मित्र आहेत असे सुचीत करून विद्यार्थ्यांना “वृक्षसंवर्धन” करणे ही काळाची गरज आहे असे सुचीत केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. विराज महाजन यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत असताना नगरपंचायतीच्यावतीने १५० रोपे दिल्याबद्दल नगरपंचायतीचे कौतुक करून अशा प्रकारच्या सहकार्याची भविष्यातही अपेक्षा व्यक्त केली.
सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाकरीता कमीत कमी दोन वृक्ष दत्तक घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.रामेश्वर सोळंके यांनी यशस्वी वृक्षारोपणामुळे महाविद्यालयाची जबाबदारी वाढली आहे आणि आम्ही ती यशस्वीपणे पार पाडू, असे मान्यवरांना आश्वासन दिले. सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेऊन महाविद्यालयीन परिसरात वृक्षलागवड केली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. प्रमोद आगळे यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.