loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक महिला शेतकरी वर्षानिमित्त ‘कृषी मित्र ग्रुप कोळंबे’ तर्फे महिला शेतकर्‍यांना मार्गदर्शन

(दापोली - सागर गोवळे)कोळंबे - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली यांच्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यअनुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी मित्र ग्रुप कोळंबे’ द्वारे जागतिक महिला शेतकरी वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी कोळंबे ग्रामपंचायत येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना शेती व्यवसायासाठी प्रेरित करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्‌या स्वावलंबी बनवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान RHWE च्या विद्यार्थ्यांनी कोळंबे गावातील महिलांना शेतीपूरक व्यवसायांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने अळंबी उत्पादन, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, मधमाशी पालन, फळ प्रक्रिया उद्योग आणि दुग्ध उद्योग यांसारख्या विविध विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन करून महिलांना हे व्यवसाय आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या उपक्रमासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र (भाट्ये) चे प्रमुख डॉ. किरण माळशे आणि विषयतज्ज्ञ डॉ. आशिष शिगवण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. काळे, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे आणि डॉ. वानखेडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमास कोळंबे गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg