loader
Breaking News
Breaking News
Foto

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास महापौर, लोकप्रतिनिधी आणि पुढे विविध राज्यांचे राज्यपाल अशा महत्त्वाच्या घटनात्मक पदापर्यंत पोहोचला. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून समाजातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. शिक्षण आणि वैद्यकीय संस्थांचे जाळे उभारण्याबरोबरच त्यांनी नवी मुंबईत जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल साकारले, तसेच कृषी व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या निधनाने एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg