loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यातील शिव - प्रभा या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष ‘आनंद शिवराम जाधव’ राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्कार - २०२६ ने सन्मानित

आबलोली(संदेश कदम)- गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र आणि शिव - प्रभा या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांना पुणे येथे राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्कार -२०२६ हा पुरस्कार देऊन, आनंद शिवराम जाधव यांना मान्यवारांचे हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे ‘आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा- २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मान्यवरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रभक्ती परिवार, वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशन, विजेता मीडिया आणि सायबर भारत न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा- २०२६’ अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. या सोहळ्यामध्ये देश आणि राज्य पातळीवर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्श कार्य करणार्‍या कर्तृत्ववान मान्यवरांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून समाजातील विविध स्तरांतील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने मान. भूषण प्रल्हादराव सुने (राष्ट्रीय सदस्य - क्राईम ब्रेन्स अँड इंटेलिजन्स कौन्सिल), मान. भारतीताई रमेश तुपे (प्रदेशाध्यक्षा - राष्ट्रभक्ती महिला संघटना), मान. सुभाष डेनकर (नगरसेवक - लोणावळा नगरपरिषद), मान . अश्विनी अशोक पाटील (अध्यक्षा - वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशन), मान. गणपत गायकवाड (तालुका अध्यक्ष - रिपाई), मान. राजेंद्र पवार (अध्यक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष, पुणे शहर), मान. पांडुरंग पिसे (आदर्श सरपंच), ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे, किशोर थोरात (राज्यअध्यक्ष - सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ), अनिता विष्णू वाघमारे (माजी सभापती - जालना), अशोक विष्णुपंत बेलापुरकर (प्रसिद्ध ८४ वर्षीय सायकलपटू), संदीप बापू रासकर(उत्कृष्ट निवेदक व कवी) या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढली.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि काव्यमय सादरीकरण प्रसिद्ध निवेदक व कवी मा. संदीप बापू रासकर यांनी केले. त्यांच्या शैलीदार निवेदनाने उपस्थितांची मने जिंकली. या संपूर्ण सन्मान सोहळ्याचे नेटके आणि देखणे व्यवस्थापन ‘विजेता मीडिया’कडून करण्यात आले होते. देशसेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत आयोजित केलेल्या या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. शेवटी राष्ट्रभक्ती परिवार व वसुधैव कुटुम्बकम् जनसेवा फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg