loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसामान्यांसाठी एकच ध्यास, पर्यावरण विकास... हरित संकल्प- सदानंदराव भोसले

खेड (प्रतिनिधी) - सह्याद्रीचा स्वाभिमान, लोकनेते सदानंदराव भोसले यांचे खंबीर नेतृत्वात बिजघर साईधाम येथे ऐतिहासिक 'हरित क्रांतीचा' शंखनाद! नेतृत्व असं असावं ज्याच्या शब्दाला वजन आणि कर्तृत्वाला धार असावी! समाजात पदे मिळवणारे अनेक असतात, पण आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाने आणि लोककल्याणकारी कार्याने जनमानसावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व विरळच! 'मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे' संस्थापक अध्यक्ष, सदानंदराव भोसले हे अशाच एका झंझावाताचे नाव आहे. ज्या नावाच्या पाठीशी जनतेची अथांग निष्ठा आहे, अशा आपल्या लाडक्या नेत्याच्या दूरदृष्टीतून नुकताच खेड तालुक्यातील बिजघर साईधाम येथे एक ऐतिहासिक आणि अत्यंत स्वाभिमानी उपक्रम पार पडला. हे कार्य अव्याहतपने गेली २७ वर्ष सुरू आहे. सदानंदराव भोसले हे केवळ एका संघटनेचे अध्यक्ष नसून ते सामान्य जनतेचा बुलंद गड आहेत. व्यक्तिमत्त्व जितके भारदस्त आहे, तितकेच त्यांचे सामाजिक क्षेत्रातील विचार आणि कृती वजनदार आहेत. जेव्हा एखादा लोकनेता समाजाच्या हितासाठी स्वतः मैदानात उतरतो, तेव्हा क्रांती कशी घडते, याचंच ज्वलंत उदाहरण बिजघर येथील 'मोफत वृक्ष वाटप' सोहळ्यातून दाखवून दिलं. या अद्वितीय कामगिरीचा आणि त्यांच्या नावाचा आज प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नागरिकाला सार्थ अभिमान वाटत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पण हा निसर्गाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवणे, वाढते प्रदूषण कमी करणे आणि शुद्ध हवेची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे, हे साहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने ओळखले. 'यु. एस. व्हि. लिमिटेड लोटे' यांच्या सहकार्याने गावातील शेकडो ग्रामस्थांना नारळ, चिकू आणि आंबा यांसारख्या मौल्यवान फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप केले. या उपक्रमामुळे बिजघर गावाच्या आर्थिक आणि पर्यावरणीय प्रगतीची एक नवी पहाट उजाडली आहे. साहेबांनी पेरलेले हे हरित विचार उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी करणार आहेत, यात तीळमात्र शंका नाही. सदानंदराव भोसले यांच्या एका हाकेवर समाजातील सर्व स्तरांतील वजनदार आणि प्रतिष्ठित मंडळी एकत्र आली, हे साहेबांच्या दांडग्या जनसंपर्काचे आणि आदराचे प्रतीक आहे. या सोहळ्याला प्रशासक शुभांगी भोसले, कॅप्टन राजारामराव भोसले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, गावचे मानकरी सुनीलराव भोसले आणि निवृत्त महिला पोलीस अधिकारी सुप्रिया भोसले यांसारख्या वजनदार व्यक्तींनी विशेष उपस्थिती लावली. तसेच राजेंद्र भिकाजीराव भोसले, राजेंद्र वामन भोसले, संजय दत्त राम भोसले, दशरथ भोसले, चंद्रकांत भोसले, गावचे पुजारी भगवान जंगम स्वामी, बिजघर नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर आणि सहशिक्षक शैलेश पराडकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ साहेबांच्या विचारांशी एकरूप होऊन या सोहळ्यात सामील झाले होते.

टाईम्स स्पेशल

हा सोहळा म्हणजे केवळ झाडे वाटण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो सदानंदराव भोसले नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सामाजिक परिवर्तनाचा एक महायज्ञ होता. साहेबांच्या प्रत्येक कार्यातून समाजहिताची आणि स्वराज्य निर्मितीची भावना दिसून येते. अशा या भारदस्त, वजनदार आणि जनमानसात आदराचे स्थान असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अभिमान आज प्रत्येकाच्या उरात आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. सदानंदराव भोसले यांची ही उल्लेखनीय कामगिरी सदैव स्मरणात राहील अशीच असून, त्यांच्या पुढील प्रत्येक सामाजिक लढ्यासाठी आणि कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मानाचा मुजरा आणि लाख लाख शुभेच्छा! गेल्या २५ वर्षात भोसले यांनी सुमारे ५० ते ५५ हजार शेतकऱ्यांना उपयुक्त नारळ आंबा चिकू रोपांचे वाटप केले असुन शेतकऱ्यांच्या परस बागेत फळ धारणा होत आहे. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना कल्याण डोंबिवली महापालिका प्रवक्ते गणेशराजे परबतराव मोरे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg