loader
Breaking News
Breaking News
Foto

मिठबाव येथे एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा, तसेच एसटी प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित व्हावा या उद्देशाने देवगड पंचायत समितीचे उपसभापती तथा कुणकेश्वर पंचायत समिती गणाचे सदस्य अमोल लोके यांच्या पुढाकारातून मिठबाव येथे एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपसभापती अमोल लोके यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या या शिबिरात मिठबावसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १०३ जणांनी स्मार्ट कार्ड नोंदणी केली. तालुक्यात विविध ठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन होत असले तरी नागरिकांना देवगड येथे जाऊन रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये, प्रवासाचा खर्च व वेळ वाचावा आणि गावातच ही सुविधा मिळावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्य शासनाने एसटी प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यामागे प्रवाशांना आधुनिक, डिजिटल आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा मुख्य हेतू आहे. या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेणे, ओळख पडताळणी सुलभ करणे, वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज टाळणे, तसेच भविष्यात एसटीच्या डिजिटल सेवांचा लाभ सहजपणे मिळविणे शक्य होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच विविध शासकीय सवलतींसाठी पात्र असलेल्या प्रवाशांना स्मार्ट कार्डमुळे अधिक सोयीस्कर पद्धतीने प्रवास करता येणार असून, तिकीट प्रक्रियेतही पारदर्शकता आणि सुलभता येणार आहे. या शिबिरासाठी देवगड येथील मी. खडपकर यांच्या माध्यमातून आवश्यक तांत्रिक व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी साडे नऊ ते २ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात अनेक नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद देत स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली. सोमवार असल्याने परिसरात वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असतानाही शिबिराच्या कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून इन्व्हर्टरच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया अखंड सुरू ठेवण्यात आली मात्र उशिरा इंटरनेटमध्ये अडथळा येऊ लागल्यात्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली .

टाइम्स स्पेशल

यावेळी उपसभापती अमोल लोके म्हणाले, स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांना देवगड येथे जावे लागते. त्यामुळे वेळ आणि एसटी प्रवासाचा अतिरिक्त खर्च होतो. ही गैरसोय टाळण्यासाठी गावातच शिबिर आयोजित केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढून शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा. भविष्यात एसटीच्या डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार असल्याने प्रत्येक पात्र प्रवाशाने स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमामुळे मिठबाव परिसरातील नागरिकांना गावातच एसटी स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत उपसभापती अमोल लोके यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg