बांदा (प्रतिनिधी) - प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे जमा आरोग्य समितीची बैठक समितीचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, औषध पुरवठा, स्वच्छता तसेच तपासणी व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, तालुका आरोग्य अधिकारी कर्तसकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, सुशांत पांगम, बाबा काणेकर, साई सावंत तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. बैठकीत सदस्य सुशांत पांगम यांनी औषध खरेदीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत स्थानिक पुरवठादारांना डावलून बाहेरील ठिकाणाहून औषधांची खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच अशा खरेदीमध्ये बिले वाढीव दाखवली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय गर्भवती महिलांना दाखल केले जाणाऱ्या कक्षात नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी एका वृद्ध महिलेला रक्त तपासणीसाठी उशिरा आल्याचे कारण देत "प्रायव्हेटमध्ये तपासणी करून घ्या" असे सांगण्यात आल्याची घटना बैठकीत मांडली. अशा प्रकारामुळे सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सूचना देत, "प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आहे. रुग्णांना परत पाठविणे किंवा खासगी तपासणीचा सल्ला देणे योग्य नाही. अशा तक्रारी पुन्हा येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी," असे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कर्तसकर यांनी बैठकीत उपस्थित मुद्द्यांची नोंद घेऊन संबंधित बाबींची चौकशी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, तसेच आरोग्य केंद्रातील स्वच्छता, औषध खरेदी प्रक्रिया आणि रुग्णसेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. बैठकीत आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भविष्यात अशा तक्रारी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.