loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वच्छ सुंदर दापोली शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे होतायेत वाहतुकीस अडथळा

दापोली (प्रतिनिधी) : स्वच्छ सुंदर दापोलीची वाटचाल खड्डडयांच्या रस्त्यावरुन सुरू झाली आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास पादचाऱ्यांना होतोच आहे शिवाय वाहन चालकांनाही या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दापोली शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था ही एखादयाचा नाहक बळी गेल्यावरच सुधारणा नगर पंचायत करणार आहे का ? अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दापोली तालूक्याचे मुख्यालय असलेल्या दापोली शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा त्रास हा केवळ दापोली शहरातीलच नागरिकांनाच होत आहे, असे नाही तर तालुक्याच्या ग्रामीण भागातून दापोलीत या ना त्या कामानिमित्त येणा-यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवाय पर्यटनासाठी येणा-यांनाही रस्त्यातील खड्डे तुडवतच महागड्या किंमतीची वाहने खड्ड्यांच्या रस्त्यानेच मार्गस्थ करावी लागत आहेत. त्यामुळे हे विदारक चित्र बदलणार तरी केव्हा असा सवाल उपस्थित केला जात आहे. दापोली हे जसे विद्येचे माहेर घर आहे तशी ती एक व्यापारी बाजारपेठ आहे. येथे कृषी विद्यापीठ असल्याने राज्यभरातील शेतकरी येथील संशोधन पाहण्यासाठी शेतीविषयक विविध पिकांची माहिती घेण्यासाठी तसेच मोठ्या संख्येने विदयार्थी शिक्षणासाठी दापोलीत येत असतात. दापोलीत विविध प्रकारची शासकीय आस्थापनांची कार्यालये असल्याने येथे आपल्या शासकीय काही कामांसाठी तसेच किराणा, भाजीपाला, मासळी, चिकन, मटण आदींसह शेतीविषयक औजारे खरेदीसाठी, बांधकामविषयक साहित्य खरेदीसाठी दापोलीतच यावे लागते.

टाईम्स स्पेशल

त्याचप्रमाणे बॅकेतील वित्तीय संस्थाकडील देव घेवींच्या व्यवहारासाठी दापोलीत आल्याशिवाय गत्यंतर नसते. असे हे दापोली शहर सर्वार्थाने महत्त्वाचे असे शहर असलेले दापोली तालुका मुख्यालयाचे ठिकाण आहे. अशा शहरातील रस्त्याची सुधारणा करून रस्ते मोकळा श्वास घेणार तरी कधी हे मात्र शासनकर्त्यानाच माहिती असे असले तरी रस्त्यातील खड्ड्यांमुळे कोणाचाही बळी जाण्याची वाट न पाहता एक सामाजिक दृष्टीकोन डोळयासमोर ठेवून नगर पंचायतीने स्वच्छ सुंदर दापोली खड्डेमुक्त करून नागरीकांचा प्रवास सुखकर करून दिलासा द्यावा. अशा प्रकारच्या मागणीने जोर धरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg